Breaking News

ऑरेंजसिटी

भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड

भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड मनपाची कारवाई :  १२ हजारांचा दंड केला वसूल चंद्रपूर, ता. २८ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. …

Read More »

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले, भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम …

Read More »

पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार   – एटापल्ली तालुक्यातील घटना 

पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षली ठार – एटापल्ली तालुक्यातील घटना अहे- गट्टा-जांबिया जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला प्राप्त झाली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून आज सकाळच्या सुमारास शोधमोहीम राबवीत असतांना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानानेही नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर देत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रां अंतर्गत …

Read More »

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा   – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेले टाळेबंदीसदृश्य कडक निर्बंध आणखी 15 दिवसांसाठी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शुक्रवारी करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध असतानाही कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असल्याने, निर्बंधांचा कालावधी आणखी 15 …

Read More »

सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार

सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार नवी दिल्ली- कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी …

Read More »

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि. 26 एप्रिल: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील.सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहतील. दुपारी 12:15 वाजता  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत शासकीय वैद्यकीय …

Read More »

गत 24 तासात  1300  कोरोनामुक्त, 1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

गत 24 तासात  1300  कोरोनामुक्त, 1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø आतापर्यंत 37,715 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,843 चंद्रपूर, दि. 26 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1300 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 54 हजार 369 वर …

Read More »

शासकीय मुलींचे निरीक्षण गृह या संस्थेकरिता इमारत भाड्याने घेणे आहे चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन

शासकीय मुलींचे निरीक्षण गृह या संस्थेकरिता इमारत भाड्याने घेणे आहे चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन चंद्रपूर दि.26 एप्रिल: अधीक्षक, शासकीय अपंग मुलांचे बालगृह, चंद्रपूर ही संस्था शासन स्तरावरून बंद करून त्याऐवजी अधिक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षण गृह- बालगृह सुरू करणेबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे. चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह …

Read More »

वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 26 एप्रिल:  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी, सकाळी 09.00 वाजता मोटारीने चंद्रपूर कडे प्रयाण करतील. 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 12.15 वाजता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार आहेत, दुपारी 12.30 …

Read More »

क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

क्रीडांगणामध्ये जम्बो कोविड रूग्णालय उभारा, आ. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना चंद्रपूर- बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील तसेच बल्लारपूर शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता विसापूर नजिकच्या भिवकुंड येथील समाजकल्याण विभागाच्या नव्या इमारतीत 60 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय उभारण्यात यावेत. यात 40 प्राणवायू खाटा, तर 20 साध्या खाटा असाव्या, त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या 50 खाटांच्या कोविड केअर केंद्राची क्षमता वाढवून 130 करण्यात यावी, …

Read More »