Breaking News

विश्व भारत

तुम्हीही राहू शकता मोदींसारखे ॲक्टिव्ह ; या गोष्टी करा…

विश्व भारत ऑनलाईन : उतरत्या वयात शरीरात एनर्जी कायम ठेवणं कठिण होतं. मात्र, आपणच आपली काळजी घेऊन एनर्जी टिकवून ठेवू शकतो. दिवसभरात कोणत्याही वेळी ड्रायफ्रूट्स आवश्य खावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलिकडेच वाढदिवस साजरा झाला. वयाच्या 70 व्या वर्षीही मोदी अत्यंत फिट आहेत. विशेष म्हणजे ते कमालीचे सक्रिय आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणं, सतत दौरे करणं, सातत्याने लोकांशी संवाद साधणं …

Read More »

नागपुरात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना, 3 हजार पोलीस, वाहतूक व्यवस्था कशी असेल? वाचा

विश्व भारत ऑनलाईन : नागपुरातील जामठा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेडियमवर शुक्रवारी, 23 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सामना होणार आहे. सामना संपल्यानंतर शहरात येणाऱ्यांकडून वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी जामठा ते रहाटे कॉलनीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला आहे. या दरम्यान प्रेक्षकांव्यतिरिक्त रस्त्यावरची वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे बुधवारी …

Read More »

महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले वन्यप्राण्यांच्या तस्करीत…. वाचा

विश्व भारत ऑनलाईन नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील  पूर्ण करू शकत नाही. मात्र मुल हे शोक पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगले आहेत. सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुल ऑनलाईन (Online) गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी (smuggling) करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन (College students) …

Read More »

जुनी पेन्शन देणाऱ्यालाच मतदान, संघटना आक्रमक

विश्व भारत ऑनलाईन : जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी रॅली काढण्यात आली .यावेळी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर नंतर छोट्या सभेत झाले. यावेळी ‘जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आम्ही मतदान करु’, असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी …

Read More »

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप ; कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : सीएनजीत दरवाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून पुकारलेला बंद तूर्तास मागे घेतला होता. मात्र, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. २६ सप्टेंबरपासून हा बेमुदत संप …

Read More »

लिपिकांची पदे भरणार ‘एमपीएससी’

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील सर्व विभागांतील वर्ग-तीन मधील लिपिकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध विभागाच्या भरती प्रक्रियेत संबंधित विभागाकडून लिपिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता आयोगामार्फत लिपिक भरती होणार. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच …

Read More »

वीज कोसळली, विद्यार्थीनी जखमी

विश्व भारत ऑनलाईन : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी या गावात शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. वैष्णवी अरविंद वावरे (वय 15, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (वय 15 रा. इंदोरा) ता. लाखांदूर अशी जखमी विद्यार्थीनींची नावे जखमींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Read More »

पोलिसांसाठी खुशखबर : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

विश्व भारत ऑनलाईन : नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनाही सणांचा आनंद घेता यावा, यासाठी एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता किती असणार सुट्ट्या? आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना …

Read More »

चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला.. कुठे घडली घटना?

विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर चारमध्ये घरात खेळणा-या एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे(वय 4)ही चिमुकली किरकोळ जखमी झाली. ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे. या वसाहतीत यापूर्वी वाघ आणि …

Read More »

गड्डीगोदाम परिसरात गडरचे पाणी-नागरिक, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

विश्व भारत ऑनलाईन: नागपुरातील कामठी मार्गावरील गड्डीगोदाम भागात असलेल्या सेंट जॉन शाळेच्या समोर महानगरपालिकेने गडरलाईनचे नवे काम सुरु केले होते. मात्र, हे काम महानगरपालिकेने अर्धवट सोडले. त्यामुळे गडरचे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर पसरत आहे. परिणामी, शाळेतील हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. यातून डेंगूचे डास तयार होत आहे.मागील महिनाभरापासून ही समस्या जैसे-थे आहे. याकडे महानगपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गडरचे …

Read More »