विश्व भारत ऑनलाईन : कुरकुरीत ब्रेड मस्तपैकी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. स्पंजी आणि कुरकुरीत ब्रेड गरम करून मग त्यावर बटर किंवा तूप- साखर लावून तो खाण्याने अनेकांच्याच वीकेंडची किंवा काहींच्या तर दर दिवसाची सुरुवात होते. सँडविच म्हणू नका किंवा मग ब्रेड पकोडा, यामध्येही हा व्हाईट ब्रेड सर्रास वापरला जातो. काहींसाठी हाच रोजचा डब्बा असतो. पण, नकळत हीच सतत व्हाईट …
Read More »विमान बनविणारा नागपुरातील प्रकल्प गेला हैद्राबादला, रोजगार बुडाला
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील मोठे प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. त्यात नागपूरातील एका प्रकल्पाची भर पडली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूकीटत अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र,प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प परत जात आहेत. विमान तसेच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक …
Read More »हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : हृदयक्रिया बंद पडल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा परिक्षेत्रात घडल्याची माहिती समोर आली आहे.वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असतानाच परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून …
Read More »मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग : गोऱ्हेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
विश्व भारत ऑनलाईन : राज्याचा प्रशासकीय कारभार मुंबई मंत्रालयातून हाकला जातो. मात्र, याच मंत्रालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव स्तरावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपसंचालक पदावर असलेल्या महिलेचा विनयभंग केला. ‘मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव’, अशा प्रकारचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवांनी …
Read More »भाजपमध्ये फूट : अकोल्यात वंचितची कमाल
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेपासून दूर आहे. ही परिस्थिती अकोला जिल्हा परिषदेत पाहायला मिळत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांच्या चुरसपुर्ण लढतीत वंचितने बाजी मारली. यात भाजपच्या दोन मतांच्या साथीने वंचितने चारही पदांवर झेंडा फडकवला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फुट पडली आहे. आज भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला …
Read More »खासदार राजेंद्र गावित अडचणीत ; १६ तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप
विश्व भारत ऑनलाईन : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गावित यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६ बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबईतील उद्योग क्रांती केंद्र या संस्थेचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे गावित यांच्यासह या संस्थेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. आरोप फेटाळले खासदार गावित यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले …
Read More »पोलीस भरती लांबणीवर
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील पोलीस भरतीबदद्ल महत्वाची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. अनेक तरुण-तरुणींनी तयारी केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. याचे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भरती लांबली असली तरी लवकरच नव्याने तारखा घोषित होतील, असे कळते.
Read More »नागपूरजवळ वाघाचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ सातनवरी भागात वाघाचे शव मिळाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच हिंगणा वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली. नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती आहे. ही घटना महसूलच्या जागेत असल्याचे कळते. याबाबत वनविभागाने तपास सुरु केलाय. मात्र, संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही.
Read More »गडचिरोली : भूकंपाचे धक्के
विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले …
Read More »औरंगाबाद : छठ पूजेत गॅसचा स्फोट ; 35 हून अधिक जखमी
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद येथे छठ पूजा करताना आज सकाळी गॅसचा स्फोट झाला. स्फोटात दोन मजली इमारतीला आग लागली. भीषण आगीत 35 हून अधिक जण जखमी झाले. तर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे पोलिसही जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादमधील (बिहार) शाहपूर परिसरातील हा भीषण स्फोट झाला. घरात अचानक आग लागली. यामुळे छठ …
Read More »
विश्वभारत News Website