Breaking News

विश्व भारत

ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार

  विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.तर,ठाकरेंना धक्का दिला आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे. आपणच …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : तुमच्या मोबाईलवर बघा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद

  विश्व भारत ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून …

Read More »

नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा

विश्व भारत ऑनलाईन : नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज उपलब्ध निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. …

Read More »

तुमचा 7/12 बघितलाय का? मोठा बदल… जाणून घ्या आजच

विश्व भारत ऑनलाईन : शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 7/12 उताऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक 7/12 उताऱ्याला वेगळा क्रमांक देण्यात आला आहे. तर, वरच्या बाजूला बारकोड असणार आहे. फसवेगिरी थांबणार यातून 7/12 उताऱ्यावर होणारी हेराफेरी, खाडाखोड, फसवेगिरी थांबणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच एका शेतकऱ्याची नेमकी कुठे किती शेतजमीन आहे, याची माहिती याद्वारे मिळण्यास मदत होईल. …

Read More »

सत्तार, गुलाबराव पाटील यांनी केल्या 3 रेल्वे,300 बसेस बुक… काय आहे कारण?

विश्व भारत ऑनलाईन : आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटत चालले आहे. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ‘गर्दी’ जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांच्याकडून 300 एसटी बुक करण्यात आल्या आहेत. पाच ऑक्टोंबरला सर्व बसेस …

Read More »

फडणवीस-जितेंद्र आव्हाड भेट, चंद्रशेखर बावनकुळेचे सूचक विधान

विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत.राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आव्हाड काय म्हणाले? मतदारसंघातील …

Read More »

नागपुरात मालगाडीवरून सेल्फी घेताना मुलगा होरपळला

  विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी म्हणजे आताच्या तरुण पिढीचा जीव की प्राण. एका सेल्फीसाठी तरुण पिढी जीव धोक्यात घालते. अशीच एक दुर्देवी घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. मालगाडीवर चढून सेल्फी घेण्याच्या नादात एका 14 वर्षांच्या मुलाचा विजेचा धक्का लागून तो होरपळला. मोहम्मद आलम असं या मुलाचं नाव असून वांजरा परिसरात ही घटना घडली आहे. मोहम्मद आलमवर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये …

Read More »

‘शिवभोजन थाळी’त गैरव्यवहार : शिंदे-फडणवीस सरकारला संशय

  विश्व भारत ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शिवभोजन थाळी ही योजना बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळे ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळत होते. कोरोना काळात किंमत 5 रूपये करण्यात आली …

Read More »

भक्तांनो,जाणून घ्या…महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील नवरात्रोत्सव

विश्व भारत ऑनलाईन : 🙏तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र पूर्ण शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवता आहे. घटस्थापनेचा कार्यक्रम : पहाटे २.३० वाजता मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना. नंतर पंचामृत स्नान. { सकाळी ६ वाजता नित्योपचार अभिषेक पूजा. { दुपारी १२ वाजता घटस्थापनेने मातेच्या नवरात्र महोत्सवास …

Read More »

संत्रा उत्पादनात घट, द्राक्ष आगमन लांबणीवर… कारण वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगाम दोन महिन्यांनी लहरी हवामानामुळे लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे, कडाक्याच्या उन्हामुळे मृग आणि अतिपावसामुळे अंबिया असे संत्र्यांचे दोन्ही बहर झडल्याने यंदा संत्री उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अतिवृष्टी, खराब हवामान आणि हवामानात वेगाने होत असलेल्या बदलांमुळे यंदा द्राक्षांचा हंगाम महिनाभराने लांबणीवर गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसर वगळता राज्यभरात कुठेही …

Read More »