Breaking News

विश्व भारत

जाणून घ्या…घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

  विश्व भारत ऑनलाईन : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा …

Read More »

कॅन्सर, मधुमेहासह 10 रोगांवर रामबाण भाजी… कोणती ?

विश्व भारत ऑनलाईन : मल्टीविटामिन, लोह आणि अनेक पौष्टिक घटक कंटोला किंवा कटूर्ला या भाजीत असतात. कटोला जो कारल्यासारखा दिसतो, या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, तिला सर्वोत्तम भाजी म्हणतात. वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळे नाव आहे. जेवणात ती चविष्ट लागते. त्यात आरोग्याचा खजिनाही आहे. लठ्ठपणापासून ते मधुमेह, बीपी नियंत्रण, कॅन्सर, फ्लू यांसारख्या अनेक मोठ्या आजारांवर ती रामबाण उपाय ठरते. बरेच …

Read More »

वर्धा-देवळी मार्गावर अपघात : 12 गंभीर

  विश्व भारत ऑनलाईन : वर्धा जिल्ह्यातील देवळी मार्गावर भीषण अपघात झालाय. मजूरांना घेवून जाणाऱ्या एका वाहनाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात मालवाहू वाहनातील चालकासह १० महिला जखमी झाल्या. तर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल केले. सालोड हिरापूर येथील विजय दाते शेतीच्या कामासाठी निघाले …

Read More »

बोगस रेल्वे टीसींना अटक… वाचा

  विश्व भारत ऑनलाईन : मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी टिसीची नियुक्ती करण्यात आली आहे. पण बोगस प्रवाशांना पकडण्यासाठी जर बोगस टीसी उभारले असतील तर? हे बोगस टीसी प्रवाशांना लुटून त्यांच्याकडून पैसे वसूल करतात, तसेच रेल्वेलाही चुना लावण्याचं काम करतात. अशाच दोन बोगस टीसींना कसारा (कल्याण-ठाणे)येथून अटक केली. काळा कोट आणि पांढरा शर्ट, हातात पावती बूक घेऊन …

Read More »

तुमचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन : स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट,फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, खेड्यात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न आणि शहरात वार्षिक तीन लाख असेल तर अशा लोकांनी त्यांचं रेशन कार्ड तहसीलमध्ये आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे अन्यथा कारवाई होऊ शकते. शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केलं नाही तर अशा लोकांचं कार्ड छाननीनंतर रद्द केलं …

Read More »

तिरुपती बालाजी : नेमकी किती संपत्ती?

विश्व भारत ऑनलाईन : जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता …

Read More »

राणेची यशस्वी खेळी, केसरकर सिंधुदुर्ग पालकमंत्री पदापासून दूर

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली.मात्र,पालकमंत्रीपदाच्या यादीवर नजर टाकल्यास सिंधुदुर्गबाबत आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो. सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर तसेच मुंबईचे पालकमंत्री म्हणून संधी देत शिंदे-फडणवीसांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचवेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यातून आमदार असलेल्या रविंद्र चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या खेळीतून असे लक्षात …

Read More »

गोंदिया : 120 विद्यार्थ्यांना जनावरासारखे कोंबले, 10 मुलांची प्रकृती बिघडली

विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यात आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार …

Read More »

अमरावती : स्त्री रुग्णालयात आग, बालकांची प्रकृती गंभीर 

  विश्व भारत ऑनलाईन : अमरावती जिल्हा स्री रुग्णालयात बेबी केअर सेंटरला शॉर्टसर्किटमुळे आज रविवारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाने दोन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले. धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन मुलांना डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान बाळांची …

Read More »

औरंगाबाद : मुख्यालयी रहा, अन्यथा कारवाई, वाद वाढणार

  विश्व भारत ऑनलाईन : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा विषय चांगलाच गाजत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह केल्यानंतर काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या. काही काळ थांबलेला मुद्दा आमदार प्रशांत बंब यांच्या मुख्यालयी राहण्याच्या आग्रहाने पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या विविध आदेशाचा संदर्भ देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे …

Read More »