Breaking News

Recent Posts

लोकप्रतिनीधींनी प्रामाणिकपणे काम केल्यास गावाचा विकास करणे शक्य – खासदार रामदास तडस

वर्धा : देवळी:- जनतेने आपल्याला गावाच्या  विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. ज्या पदावर आपण विराजमान होतो. त्या पदाचे अधिकार, कर्तव्ये, नियम समजून घेतले पाहिजेत. गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम गावाच्या गरजांचा अभ्यास करा. ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभाथ्र्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणा–या कर्मचा–यांची गावाच्या विकासाप्रती मानसिकता असणे महत्वाचे आहे, आपण प्रामाणिकपणे काम केले तर सरपंच आणि सचिव मिळून गावाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो, सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.              माजी सभापती व जि.प.सदस्य मुकेश भिसे यांच्या प्रयत्नातुन इसापूर, बाबुळगांव खोसे, हुसनापूर, विजयगोपाल,चोंदी, शिरपूर (होरे) येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प.उपाध्यक्षा सौ. वैशाली ज. येरावार, समाजकल्याण सभापती विजयराव आगलावे, जि.प.सदस्य व माजी सभापती मुकेश भिसे, उपसभापती प.स. युवराज खडतकर, जि.प.सदस्य सुनिताताई राऊत,प.सदस्य शंकरराव उईके, जयंत येरावार, तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, गजानन राऊत, इसापूरच्या सरपंच सौ. प्रणिता आबंटकर, उपसरपंचत करपते, बाबुळगांव खोसेचे सरपंच अमोल आ़त्राम, उपसरंपच गुणवंत चांदेकर, भिडीचे सरपंच सचिन बिरे, उपसरपंच अतुल क्षेत्री, विजयगोपालचे सरपंच व उपसरपंच, चोंदीचे सरपंच संतोशराव मसराम,  उपसरंपच दिनेश लोहे, शिरपुरचे सरंपच रविन्द्र भाणारकर, उपसरपंच सौ. राधाबाई लडके, मुरदगाव खोसेचे सरपंज गजानन हिवरकर, लोणी सरपंच वैभव श्यामकुवर, वासुदेवरा वाकुडे व इसापूर, बाबुळगांव खोसे, हुसनापूर, विजयगोपाल, चोंदी, शिरपूर (होरे) ग्रामपंचायतचे सर्व सचिव, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read More »

आयटक स्वर्ण शताब्दी समारोह सांगता… शंभर वर्ष पुर्ण करणारी देशातील पहिली कामगार संघटना आयटक– काँ दिलीप उटाणे

वर्धा :- भारतातील कामगार चळवळीला १०० वर्ष ३१ आँक्टोबर २०२० रोजी पूर्ण होत झाले .यांचा आनंद आहे परंतु आजच्या परिस्थितीत रोजगारच संपुष्टात आणल्या जात आहे रोजगार नसल्यामुळे भयावक परिस्थिती उदभण्याचे चिन्ह दिसत आहे . अशा परिस्थितीत कामगार चळवळीला व *शंभर वर्षे पुर्ण करणारी देशातील पहिली कामगार संघटना *आयटक* (आँल इंडिया टेड युनियन काँग्रेस) आहे मत आयटक राज्य उपाध्यक्ष काँ.दिलीप उटाणे …

Read More »

आमदार दादाराव केचे धावून आले देवासे कुटुंबीयांच्या मदतीला

कारंजा तालुक्यातील मोर्शी गावातील शिवाजीराव देवासे यांच्या राहत्या घराला ३१ अॉक्टोबर २०२० ला घरात कोणी नसतांना अचानक आग लागल्याचे आमदार दादाराव केचे यांना कळता क्षणी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुमावत यांना दुरध्वनीने संपर्क करून वस्तुस्थितीची पाहणी करून मोका पंचनामा करण्यास सांगितले होते. दिनांक १ नोव्हेंबर २०२० ला स्वतः आमदार दादाराव केचे यांनी देवासे यांच्या घराची तहसीलदार कुमावत यांच्यासह मोका पाहणी केली. …

Read More »