Breaking News

Recent Posts

वैनगंगा नदीत तीन विद्यार्थी बुडाले

हृदय पीळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे.गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षात शिकत असलेले तीन विद्यार्थी वैनगंगा नदीत बुडाले. गोपाळ गणेश साखरे (२०, रा. चिखली, बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (२०, रा. शिर्डी, जि. अहिल्यानगर) आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे (२०, रा. संभाजीनगर), अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. ही घटना आज, शनिवारी सायंकाळी घडली. तिघांचाही शोध सुरू आहे.   आज शासकीय सुटी …

Read More »

भारत-पाकिस्तान युद्ध थांबले : मोठी बातमी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सध्या दोन्ही देशातील युद्ध थांबले आहे. दोन्ही सरकारने निर्णय घेतल्याची माहिती आहे.यादरम्यान दोन्ही देशांकडून काल रात्री आणि शनिवारी सकाळी एकमेकांच्या लष्करी तळांवर अनेक हल्ले करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने रविवारी (११ मे) पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी १२ वाजेपर्यंत (दुपारी १२:३० आयएसटी) सर्व हवाई वाहतुकीसाठी त्यांचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. …

Read More »

नागपुरच्या रस्त्यांची अवस्था बघून हायकोर्ट चिडले

नागपूर शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला ‘एनएचएआय’ आळा घालू शकत नाही, असे भाष्य करून प्रकल्प संचालकाच्या वर्तवणुकीवर शंका व्यक्त करत न्यायालयाने चौकशीची तंबी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाच्या पगारातून एक लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले.   अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका शहरातून …

Read More »